Posts

Image
*देहरंगाच्या सांजधारा ------*     आमची जातकुळी भटक्याची. चरितार्थासाठी नोकरीची झूल पांघरतो. आजूबाजूला दिसणारे गडकोट बऱ्याच वेळा साद घालतात, खुणावतात पण मनात आलेली अनिवार इच्छा मनातच दाबली जाते. आजूबाजूला चाललेला अस्मितांचा आक्रोश, अहंकाराच्या दंभातून उठलेला उग्र दर्प, सत्तेसाठी किंवा पैशासाठी, स्वार्थासाठी आणिक जाती-धर्मांच्या वर्चस्वासाठी चाललेला खेळ पहाता पहाता आजवर आपण जे शिकलो,वाचले,गुरुजनांनी जे संस्कार केले ते चुकीचे होते काय असे जेव्हा उद्विग्नपणे वाटू लागते तेव्हा मी खुर्चीतून अचानक उठून उभा राहतो आणि माणसांच्या या जंगलातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो. बेवड्याला जशी दारूची दुकाने माहिती असतात,ती दाखवावी लागत नाहीत तशी भटक्याला कुठे भटकायचे ते दाखवावे लागत नाही. एका भटक्याने  दिशा दिली देहरंगाची,निघालो मग त्या देह रंगात न्हावून निघायला....      पनवेल शहर मायानगरी ,महानगरी मुंबईच्या शेजारी अंग चोरून कावरेबावरे होऊन बसलेल्या लहान मुलासारखे आहे. या शहराला पाणीपुरवठा करणारे देहरंग धरण.शहरापासून जेमतेम अर्धा तासाच्या अंतरावर असणारे. माथेरानच्या डोंगरात उगम पावणारी गाडी नदी.तिच्या